नाशिकमध्ये वेगवेगळ्या दोन छाप्यात 31 लाखाची रोकड जप्त
बिगाराच्या घरात सापडले 11 लाख नाशिक , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सुमारे 31 लाख रुपयांची रोकड सापडले असून ती जप्त केल्यात आलेली आहे ही कारवाई परिमंडळ दोन मधील उपनगर आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाल
नासिक मध्ये वेगवेगळ्या दोन छाप्यात 31 लाखाची रोकड जप्त,


नासिक मध्ये वेगवेगळ्या दोन छाप्यात 31 लाखाची रोकड जप्त,


बिगाराच्या घरात सापडले 11 लाख

नाशिक , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिक शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सुमारे 31 लाख रुपयांची रोकड सापडले असून ती जप्त केल्यात आलेली आहे ही कारवाई परिमंडळ दोन मधील उपनगर आणि सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाली असून. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पैशाचा महापूर होऊ नये यासाठी म्हणून निवडणूक आयोगाने काही आदेश दिले आहेत त्या आदेशाची अंमलबजावणी करत ठीक ठिकाणी तपासणी नाके हे करण्यात आले आहेत अशी तपासणी करत असतानाच सातपुर पोलीस ठाणे हद्यीमध्ये पिंपळगाव बहुला येथे नेमण्यात आलेल्या एस.एस.टी. पॉईटवर नेमण्यात आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार हे वाहनांची तपासणी करत असतांना त्यांना एक बंद बॉडी असलेले वाहन एमएच-१४/केओ ५१८४ या वाहनामध्ये अवैधरित्या ठेवलेले रक्कम रु. २० लाख ,५० हजार अशी रोख रक्कम मिळुन आली आहे . या गाडीसोबत असलेल्या महेश शरद गिते याचेकडे सविस्तर विचारपुस केली असता त्यांना रकमेबाबत काहीएक समाधानकारक अथवा त्या रकमेच्या मालकी हक्का बाबत काहीएक सांगता आले नाही. पोलीसांनी सदरची अवैध रित्या मिळुन आलेली रोख रक्कम ही जप्त करणेत आली असुन त्याबाबत एफ.एस.टी. पथकाचे प्रमुख. अजय गवांदे यांचे ताब्यात देण्यात आली आहे.

तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्यीमध्ये वास्तव्यास असलेला ऋषीकेश माधव वानखेडे या बिगारी काम करणारी व्यक्ती ही माणिकनगर, भालेराव मळा, जय भवानी रोड या ठिकाणी राहत असून त्यांच्याकडे रोख रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे घर झडती घेतली असता घरी बेकायदेशीर व संशयास्पद रोख रक्कम व सोन्याचे दागिन सापडले आहे‌ .

सदरची कारवाई ही. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर, वपोनिरी, रणजित नलवडे, सातपुर पोलीस ठाणे, पोनिरी. विश्वास पाटील, पोहवा आहेर, पाटील, पोकॉ. बहिरम, मपोकॉ. परदेशी व महसुल विभागाचे . अजय निकम व महेश थेटे हे सदर कामगिरीमध्ये सहभागी झाले होते. तसेच उपनगर येथे पोलीस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे

.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande