जळगाव - पिकअपची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर
जळगाव, 1 जुलै (हिं.स.)जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरजवळ भरधाव पिकअप वाहनाने दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव - पिकअपची दुचाकीला धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर


जळगाव, 1 जुलै (हिं.स.)जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरजवळ भरधाव पिकअप वाहनाने दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील जुम्मा फकीरा तडवी (वय ४२) हे पत्नी संजिदा तडवी यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. संजिदा तडवी या बचत गटाच्या सदस्य असल्याने त्या जळगाव येथे आयोजित एका शिबिरात सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी २७ जून रोजी शिबीर आटोपल्यानंतर संजिदा तडवी पती जुम्मा तडवी यांच्यासोबत आपल्या दुचाकीने (एमएच १९ ईएल २५८२) सावखेडा सीम येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य जळगाव ते ममुराबाद रस्त्याने जात असताना, प्रजापत नगरजवळ एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संजिदा तडवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती जुम्मा तडवी गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर पिकअप चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अखेर ३० जून रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande