अकोला - मूर्तिजापूर मध्ये पोलिसांचा अवैध दारूवर ऑपरेशन प्रहार
अकोला, 1 जुलै (हिं.स.)। जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सध्या अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आज १ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्
P


अकोला, 1 जुलै (हिं.स.)। जिल्हा पोलीस अधीक्षक, अर्चित चांडक यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सध्या अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आज १ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून एलसीबीचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी नाकाबंदी चे निर्देश दिल्या वरुन पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर हददीतील बुब पेट्रोल पंप जवळ स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाने बुब पेट्रोल पंप जवळ. मूर्तिजापूर या ठिकाणी आरोपी योगेश अनिल कनोजे वय 33 वर्ष, रा. समता नगर, हा अवैध रित्या दारूची वाहतूक करत आहे अशा बातमी वरुन दारू रेड केला असता देशी दारू 15 तसेच विदेशी दारू 2 बॉक्स किमती 69,920/- चारचाकी गाडी कि. 5,00,000/-एकूण कि. 5,69,920/- अशा प्रकारे आहे की वर नमूद घ. ता. वेळी गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाल्यावरून नाकाबंदी करून रेड केला असता आरोपीच्या ताब्यात वर नमूद देशी विदेशी दारू मिळून आली. वरून मूर्तिजापूर शहर पो. स्टे. ला दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक , अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय विजय चव्हाण, पोउनी गोपाल जाधव, दशरथ बोरकर, HC खुशाल, सुलतान पठाण, PC सतिश, अन्सार. स्वप्निल, गोकुळ चव्हाण यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande