जैन समाजासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन, राज्य सरकारचे मनःपुर्वक आभार - ललित गांधी
कोल्हापूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी सातत्याने ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशनने (AIJMF) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सरकारकड
जैन समाजासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन, राज्य सरकारचे मनःपुर्वक आभार - ललित गांधी


कोल्हापूर, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी सातत्याने ऑल इंडिया जैन मायनोरिटी फेडरेशनने (AIJMF) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले. महामंडळाची स्थापना झाल्याने जैन समाजात मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री व राज्यसरकारचे मनःपुर्वक आभार मानले आहे.

या निर्णयामुळे आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील जैन समाजाच्या उन्नतीचे द्वार खुले झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात २८ एप्रिल, २०२४ मध्ये राज्यभरातील समाज बांधवांच्या उपस्थितीत जैन समाजाची भव्य सभा झाली होती. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर ललित गांधी यांनी महामंडळासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्यातील १६० आमदार आणि २८ खासदारांनी या संदर्भात शिफारस पत्रेही दिली होती. अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना केल्याचा निर्णय जाहीर केला. निश्चितच याचा लाभ जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. अनेक जनहिताचे निर्णय घेवून सर्वसामान्यांना व सर्वच घटकांना न्याय देण्याऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, राज्य कार्यकारी महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्र्यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही AIJMF चे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राष्ट्रीय शिखर संस्था

ऑल इंडिया जैन मायनोरीटी फेडरेशन’ ही समस्त जैन समाजाची ‘अल्पसं‘ख्याक कल्याण’ विषयक कार्य करणारी राष्ट्रीय शिखर संस्था आहे. महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये ६५० शाखांच्या माध्यमातून दीड लाखांहून अधिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. जैन समाजाच्या संपूर्ण भारतातील एकूण सं‘ख्येपैकी सर्वाधिक म्हणजे ६० लाख इतक्या सं‘ख्येने जैन समाज महाराष्ट्रात वास्तव्यास आहेत. जैन समाजाची देशातील सर्वाधिक लोकसं‘ख्या असलेले राज्य ‘महाराष्ट्र राज्य’ आहे. समाज सर्वाधिक सामाजिक संस्था चालविण्यासह जैन समाज व्यापार-उद्योगामध्येही अग्रेसर असून सर्वाधिक कर देणारा समाज आहे. याच समाजात शेतकरी वर्गही असून निम्न मध्यमवर्ग आणि दारिद्रय रेषेखालील लोकांची ३० टक्के संख्या आहे.

महामंडळाची गरज का होती ?

हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्मातील महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक क्षेत्रांचा विकास व संरक्षण, जैन साधु-साध्वी यांची सुरक्षा, जैन धर्म-संस्कृति-साहित्य यांचे संवर्धन व सुरक्षा, जैन युवकांना उद्यमशीलतेसाठी आर्थिक सहाय्य, जैन विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमांसाठी महामंडळ गरज होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande