ठाणे - अविनाश फडतरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांचा सन्मान
ठाणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्
Thane


ठाणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला.

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांच्या शुभहस्ते १२ अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आला.‌

या प्रसंगी मार्गदर्शन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता सदिच्छा दिल्या. त्याचबरोबर ग्रामीण भागात ३० पेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केले. सेवानिवृत्त शिक्षकांनी त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करू शकता असे आवाहन केले. पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

शाखा अभियंता (पंचायत समिती मुरबाड) तुकाराम जंगम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रशासनाचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे समाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. सामाजिक क्षेत्रात पुर्णवेळ कामकाज करणार अशी भावना‌व्यक्त केली. सेवानिवृत्त शिक्षकांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी कामकाज करणार अशी भावना व्यक्त केली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण विभाग प्राथमिक ०७, ग्रामपंचायत विभाग ०१, आरोग्य विभाग ०२, सामान्य प्रशासन विभाग ०१, बाधंकाम विभाग ०१, असे जिल्हा परिषदेचे एकूण १२ अधिकारी व कर्मचारी सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, विकास अधिकारी, शाखा अभियंत, विकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक महिला, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande