प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी संस्थास्तरीय फेरीची कार्यवाही सुरु
ठाणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदव
प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी संस्थास्तरीय फेरीची कार्यवाही सुरु


ठाणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।शैक्षणिक वर्ष 2024-2025 करिता प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशाचा अंतिम दि.23 ऑक्टोबर 2024 असल्याने शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे या संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय वर्षातील रिक्त राहिलेल्या व रिक्त होणाऱ्या जागांवर प्रवेश देण्याकरिता संस्था स्तरावरील एक अतिरिक्त प्रवेश फेरी दि.9 ऑक्टोबर 2024 रोजी संस्थेत आयोजित करण्यात येणार आहे. नंतर रिक्त झालेल्या जागांसाठी परत दि.22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रवेश फेरी घेण्यात येईल.

तरी प्रवेशास इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रके व शुल्क घेवून दि.9 ऑक्टोबर 2024 व 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता संस्थेत उपस्थित राहावे. संस्थेमध्ये यापूर्वी प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शाखाबदल हवा असेल, अशा इच्छुक उमेदवारांना देखील या फेरीसाठी उपस्थित राहता येईल. अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळ www.gpthane.org.in येथे भेट द्यावी, असे ठाणे शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय महाजन यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande