भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची - कुलगुरु माधुरी कानिटकर
नाशिक, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील ग्रीन कॅम्पसला न्यू इरा इंग्लिश स्कु
भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची - कुलगुरु माधुरी कानिटकर


नाशिक, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील ग्रीन कॅम्पसला न्यू इरा इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांनी भेट दिली. याप्रसंगी नाशिक येथील न्यू इरा इंग्लिश स्कुलच्या शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रति-कूलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, न्यू इरा स्कुलच्या ट्रस्टी श्रीमती सुनिता बोहरा, श्रीमती उमा, उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, डॉ. स्वप्नील तोरणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रदिप आवळे, ब्रिग. सुबोध मुळगुंद, आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, भावी पिढी आदर्श होण्यासाठी शिक्षकांचे कार्य महत्वपूर्ण आहे. विद्यापीठाने शालेय शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी स्कूल कनेक्ट उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. याउपक्रमाद्वारे आरोग्य विद्यापीठास भेट देऊन विद्यापीठाची कार्यपद्धती व शिक्षण प्रणाली याविषयी माहिती देणे सोयिचे होेणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यासाठी शिक्षकांनी नेहमी प्रयत्नशिल रहावे. मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे. विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करुन देणे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरुन विद्यार्थी विकसित भारतासाठी विद्यार्थी नक्कीच प्रयत्नशिल राहील. आई-वडील यांच्यानंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती देत असतात. विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत असतात. शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते, त्यामुळे त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासही मदत होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमहत्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची असते असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात पंचज्ञानेंद्रिये आधारित वृक्षांची लागवड करुन सेन्सरी गार्डन विकसित करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. शरिराला झोप आवश्यक असते यासाठी मानसिक शांतता मिळावी यासाठी प्रत्येकाने प्राणायम व योगअभ्यास करणे गरजेचे आहे. दरारोज ओमकार जप किंवा संगीत ऐकावे जेणेकरुन मानसिक तणावाचे निर्मुलन करता येईल यासाठी विद्यापीठ प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande