कोसंबी गावात कार्यकर्त्यांमध्ये भांडण; मुल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
चंद्रपूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुल तालुक्यातील कोसंबी गावात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व संतोष रावत हे दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात भांडण झाल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ब
कोसंबी गावात कार्यकर्त्यांमध्ये भांडण; मुल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल


चंद्रपूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। मुल तालुक्यातील कोसंबी गावात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व संतोष रावत हे दोन राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यात भांडण झाल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

बल्लारपुर विधानसभा मतदार संघात उभे असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. त्यावेळी तेथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार संतोषसिंग रावत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासोबत मुनगंटीवार चर्चा करीत असलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जमवून मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग केले. संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करून भांडण केले. अशी याबाबतची तक्रार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी दिली. त्यावरून मुल पोलिस स्टेशन येथे संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम,विजय चिमडयालवार व इतर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान दुसऱ्या पक्षाच्या तक्रारीनुसार कांग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे वाहनचालक राजू माणिकराव गावतुरे यांनी शिवीगाळ मोबाईलने व्हिडीओ चित्रीत करीत असतांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. बल्लारशा विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.

दरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गुंडगीरी खपवून घेणार नाही, पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेस गुंडगीरीवर उतरली आहे. त्यांच्या या गुंडगीरीला जनताच योग्य उत्तर देईल, असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande