जळगाव : देशी दारुचे ५० खोके जप्त
जळगाव, 19 नोव्हेंबर (हिं.स.)विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या देशी दारु घेवून जाणारे चारचाकी वाहनातुन देशी दारुचे ५० खोके पोलिसांनी जप्त केल्याने दारुची वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पाचोर
जळगाव : देशी दारुचे ५० खोके जप्त


जळगाव, 19 नोव्हेंबर (हिं.स.)विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या देशी दारु घेवून जाणारे चारचाकी वाहनातुन देशी दारुचे ५० खोके पोलिसांनी जप्त केल्याने दारुची वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ रणजीत पाटील हे शहरातील जारगाव चौफुली ते जळगाव चौफुली येथे गस्तीवर असताना भारत डेअरी स्टॉप ते जळगाव चौफुली दरम्यान एक मारुती सुझुकी वाहन क्रं. (एमएच ३० पी १८१३) या चारचाकी वाहनात हिरव्या कापडाने काहीतरी झाकलेले गस्तीवर असलेल्या पथकाच्या लक्षात येताच तात्काळ व्हॅव थांबवून वाहन चालकाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता.

दरम्यान व्हॅनची झडती घेतली असता त्यात १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ५० खोके त्यात एका खोक्यात १८० एम. एल. च्या ४८ देशी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या. पथकाने ७० हजार रुपये किंमतीची मारुती सुझुकी व्हॅन व देशी दारुचे खोके जप्त करत व्हॅन चालक सुशिल कानडे (वय ४२) रा. मानसिंगका नगर, पाचोरा यास ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे.

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande