इस्रायली हल्ल्यात गाझा पट्टीतील मृतांची संख्या २५वर
लेबनॉन , २ नोव्हेंबर (हिं.स.): इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांत गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये मृतांची संख्या २५वर पोहोचली आहे. यात पाच बालकांचा समावेश आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू लेबनॉनमध्ये झाला. हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांमध्ये १८ महिन
इस्रायल


लेबनॉन , २ नोव्हेंबर (हिं.स.):

इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांत गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये मृतांची संख्या २५वर पोहोचली आहे. यात पाच बालकांचा समावेश आहे. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू लेबनॉनमध्ये झाला. हल्ल्यांमध्ये ठार झालेल्यांमध्ये १८ महिन्यांच्या बालिकेसह तिची १० वर्षीय बहीण यांचा समावेश आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू चार महिन्यांपूर्वीच्या एका इस्रायली हल्ल्यात झाला होता. शुक्रवारी झुवैदा येथे एक मोटरसायकल आणि देर-अल-बालाहमध्ये एक घर इस्रायली लष्कराच्या लक्ष्यावर होते. या कारवाईत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी काही मृतदेह अद्याप मिळत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao


 rajesh pande