नाशिक जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान, नांदगावला नोटा फाडल्या, सौम्य लाठीमार
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांचे भवितव्य हे बंद झाले असून या काळात जिल्ह्यामध्ये सुमारे सरासरी 69.39 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्य
नाशिक जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान, नांदगावला नोटा फाडल्या, सौम्य लाठीमार


नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात अनेक दिग्गजांचे भवितव्य हे बंद झाले असून या काळात जिल्ह्यामध्ये सुमारे सरासरी 69.39 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली या मतदानात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदानाचा वेग हा कमी होता पण त्यानंतर बारा वाजेपर्यंत असलेल्या कालावधीमध्ये मतदान हे सात टक्क्यांनी वाढले. तर दुपारी एक वाजेपर्यंत हे मतदान सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाली त्यानंतर मात्र तीन वाजेपर्यंतच्या मतदानात घट झाली या कालावधीमध्ये मतदान कमी झाले परंतु तीन ते पाच या कालावधीमध्ये झालेल्या मतदानामध्ये वाढ होऊन हे मतदान सरासरी २५ टक्क्यांनी वाढले. जिल्ह्यातील मतदानाला सुरुवात झाली त्यानंतर सकाळी शांततेत हे मतदान सुरू होते परंतु नंतर मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघातील काही प्रकार वगळता जिल्ह्यात जवळपास सर्वत्र मतदान शांततेत झाले.

जिल्ह्यामध्ये मतदान संपल्यानंतर सरासरी 69.39% मतदान झाले असून त्यामध्ये नांदगावला 59.3 मालेगाव बाह्य 57.56 मालेगाव मध्य 61.58 बागलान 53.84 कळवण ७०.३५ येवला 65.1 सिन्नर 68.69 निफाड 63.69 दिंडोरी 63.25 निफाड 71.97 नाशिक पूर्व 49.6 नाशिक पश्चिम 51.49 देवळाली 50.39 इगतपुरी 57.8 टक्के मतदान झालेला आहे. या मतदानामध्ये प्रथम दर्शनी मिळालेल्या आकडेवारीनुसार पुरुषांचे 69.43 तर महिलांचं 69.35 टक्के मतदान झाला आहे.

लाडकी बहीण योजनेचा फायदा नाही

राज्य सरकारने अतिशय मोठ्या प्रमाणावरती गाजावाजा करण लाडकी बहीण योजना ही राबवली परंतु या योजनेचा फायदा जिल्ह्यामध्ये खूप काही झाला असे म्हणता येणार नाही जिल्ह्यातील येवला मतदारसंघांमध्ये 67.42सिन्नर मध्ये 68.50 आणि दिंडोरी मध्ये 63.35 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला याव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघांमध्ये पुरुषांच मतदानाचा आकडा हा जास्त आहे त्या तुलनेमध्ये महिलांचा आकडा हा कमी आहे त्यामुळे नाशिक मध्ये लाडकी बहीण योजना ही किती यशस्वी झाली हे यावरून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा जो अपेक्षित प्रतिसाद होता तो मिळाला त्यामुळे सकाळच्या वेळेस जास्त मतदान झाले मात्र 9 वाजे नंतर या मतदानाची संख्या कमी झाली त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा सर्वसामान्य असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यामध्ये नांदगाव या मतदारसंघाला वगळता इतर मतदारसंघात मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली मालेगाव मध्ये काहीसा अनुचित प्रकारे घडला परंतु तातडीने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो मिटला तर नाशिक पश्चिम मध्ये सायंकाळच्या वेळेस पोलिसांनी सौम्य लाठी मार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande