लाडकी बहिण'च प्रभावी मुद्दा रात्री साडेनऊ वाजता पाच केंद्रावर मतदान
अमरावती , 21 नोव्हेंबर (हिं.स.)मेळघाट मतदार संघात प्रत्येकच निवडणूकीत मतदानाची टक्केवारी चांगलीच राहते. मेळघाटातील मतदारांनी तीच परंपरा विधानसभा निवडणूकीतही कायम ठेवली आहे. आठ मतदार संघातील सर्वाधिक मतदानाच्या टक्केवारीचा विकम यावेळीसुद्धा मेळघाटने क
लाडकी बहिण'च प्रभावी मुद्दा रात्री साडेनऊ वाजता पाच केंद्रावर मतदान


अमरावती , 21 नोव्हेंबर (हिं.स.)मेळघाट मतदार संघात प्रत्येकच निवडणूकीत मतदानाची टक्केवारी चांगलीच राहते. मेळघाटातील मतदारांनी तीच परंपरा विधानसभा निवडणूकीतही कायम ठेवली आहे. आठ मतदार संघातील सर्वाधिक मतदानाच्या टक्केवारीचा विकम यावेळीसुद्धा मेळघाटने केला आहे. ७९.७५ टक्के मतदान मेळघाट मतदार संघात झाले आहे. दरम्यान बुधवारी रात्री साडेनऊ वाजताही मेळघाटातील पाच मतदान केन्द्रांवर मतदान सुरूच होते. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मेळघाट मतदार संघात या निवडणुकीत महायुती, मविआ, प्रहार यांच्यात त्रिकोणी लढत अपेक्षित आहे. या मतदार संघात २०१९ मध्ये प्रहारचे राजकुमार पटेल विजयी झाले होते. दरम्यान यावेळी मतदार संघात प्रचारादरम्यान सुरूवातीपासून लाडकी बहिण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. मतदानात तो मुद्दा महत्वाचा ठरल्याचा अंदाज राजकिय जाणकारांनी वर्तवला आहे. याव्यतिरीक्त मेळघाटात स्थानिकांना पुरेशा प्रमाणात रोजगाराच्या सोई नाहीत. आजही हा ज्वलंत प्रश्न आहे. सोबतच शेतीमालाला नसलेला भाव, रस्ते, पाणंद रस्ते आणि योग्य प्रमाणात न मिळणारी आरोग्य, शिक्षणसुविधा हे मुद्देसुद्धा प्रचारात सातत्याने गाजले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande