अमरावती 21 नोव्हेंबर (हिं.स.): जिल्ह्यात विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या अनुशंगाने निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वच पक्षांना प्रचारासाठी १८ नोव्हेंबरच्या सायंकाळ पर्यंत प्रचाराची मुभा दिली होती. परंतू राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अमरावती मधील अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांच्या वतीने प्रचंड फोन कॉल करण्यात येत होते त्यामुळे अनेक मतदार संतप्त झाल्याचे दिसून आले. २० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजे पर्यंत प्रचाराचे कॉल सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात होता. जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. सोशल - मीडियावर लक्ष करण्यासाठी व भरारी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. जिल्ह्यात या दरम्यान अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. निवडणूक विभागाच्या वतीने १८ नोव्हेंबर सायंकाळ पर्यंत प्रचाराची मुभा दिली होती. दरम्यान २० नोव्हेंबर सकाळ पासून दुपार पर्यंत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांचे रेकॉर्डिंग कॉल हजारो नागरिकांच्या मोबाईल वर खनन असल्याचे दिसून आले. हे रेकॉर्डिंग कॉल जो पर्यंत मोबाईल धारक स्वीकारत नाही हो, पर्यंत त्या फोन वर हे कॉल सतत येत असल्याने मतदार ही त्रस्त झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे प्रचार संपल्यानंतर ही या पध्दतीने प्रचार होत असल्याने यावर निवडणूक विभागाच्या वतीने यावर कारवाई केली जाते की नाही याकडे नागरिकांच्या नजरा आहेत.
यासंदर्भात मतदार दुर्वास रोकडेंनी सांगितले की, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकाळी ७ वाजे पासून दुपारी २ वाजेच्या दरम्यान अनेक वेळा फोन आला. राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ व भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करण्यासाठी आव्हान करणारे रिकॉर्डीग कॉल आले. अखेर मोबाईल बंद करावा लागला तेव्हा कॉल बंद झाल्यासे रोकडेंनी सांगितले.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी