मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. विशाखाला कळतं की लकी हाच शार्दुल आहे आणि बनी त्याचा मुलगा आहे. ती डीएनए चाचणीद्वारे हे कन्फर्म करते आणि बनी हा खरोखरच लकीचा मुलगा असल्याचे सिद्ध करते. त्या बदल्यात ती आकाशकडे पैशांची मागणी करते. या सगळ्यात बनीचे अपहरण झालाय. अपहरणाच्या तपासाची जबाबदारी वसू घेते. बनी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाला धक्का बसलाय आणि वसू लकीवर अपहरण घडवून आणल्याचा जाहीर आरोप करते. एका भावनिक क्षणात, वसू लकीसोबतचे तिचं खरं नातं उघड करते. विशाखा आकाशला बनीसोबत एक व्हिडिओ कॉल दाखवते. जयश्री आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतेय, पण बनीला वाचवण्याचा आकाशचा निर्धार आहे. आकाश अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचतो त्याच क्षणी आकाशला गोळी लागते. वसू आकाशला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाते पण....
आकाशचा जीव वसू वाचवू शकेल? लकी आणि विशाखा आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील ? आकाश आणि वसूच्या नात्याचं काय असेल भविष्य ? बघायला विसरू नका दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर