धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत मिळणार प्रवेश
लातूर, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योज
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत मिळणार प्रवेश


लातूर, 29 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा येथील साबरमती द ग्लोबल स्कूल या शाळेची १०० विद्यार्थी आणि लातूर येथील स्वामी विवेकानंद इंटीग्रेशन इंग्लिश स्कूल या शाळेची १०० विद्यार्थी प्रवेशासाठी निवड झालेली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करावेत.

या योजनेंतर्गत शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिले ते पाचवीमध्ये शिक्षण घेणारा असावा. विहित नमुन्यातील अर्ज लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचा दाखला, पूर्वीच्या शाळेत शिकत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र (इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी) सोबत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कमलाकर चव्हाण (भ्रमणध्वनी क्र. ७०२०३७०४२८) यांच्याशी संपर्क साधावा, असे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक शिवकांत चिकुर्ते यांनी कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande