अकोला, 13 जानेवारी (हिं.स.)।
शिधापत्रिकेची छपाई आणि वितरण बंद करण्यात येऊ नये. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.
राज्यात शासनाने नुकतेच परिपत्रक काढून आता सर्व प्रकारच्या नवीन शिधापत्रिकाची छपाई बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.यातून असे दिसून येत आहे की महाराष्ट्र शासनाला आता सर्व प्रकारच्या योजना हळूहळू बंद करायच्या आहेत.लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ जास्तच जास्त कसे भेटले पाहिजे हे शासनाचे कर्तव्य आहे व त्याचे सर्वात प्राथमिक घटक हे शिधापत्रिका नुसार ठरवण्यात येतात तेच जर बंद करण्यात येईल तर सामन्य जनतेत ह्याबाबत रोष निर्माण होईल.शासनाने जरी इ शिधापत्रिका तयार केली तरी सर्वांना त्याचा लाभ कसा घेता येईल याची कुठेच सुवाच्यता नाही.ज्यांच्या कडे आधुनिक मोबाईल नाही त्यांनी ही इ शिधापत्रिका कुठे व कशी वापरावी.महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना मध्ये ह्याचा वापर सर्वसामान्य नागरिक कसे करतील हा विचार होणे आवश्यक आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या विचारात घेऊन शिधापत्रिकेची छपाई बंद न करता छापील आणि इ शिधापत्रिका हे दोन्ही गोष्टी सुरू ठेव्यावात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अकोला यांना केली आहे.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,शहर अध्यक्ष सौरभ भगत,उपशहर अध्यक्ष मुकेश धोंडफळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे