सोलापूर, 14 डिसेंबर (हिं.स.) : बार्शी ते जामगाव रोडवरील हॉटेल टुरिस्ट लॉजिंगमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. त्यावेळी तेथील परजिल्ह्यातील दोन व महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यातील एका तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या पीडितांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने अटक केलेल्या लॉज मालक व व्यवस्थापकास पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. बार्शीतून जामगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टुरिस्ट हॉटेल आहे. तेथील लॉजिंगवर बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या हॉटेलवर छापा टाकला. तत्पूर्वी, बनावट ग्राहक पाठवून त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री केली. त्या बनावट ग्राहकाकडून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड