छत्रपती संभाजीनगर, 30 जुलै (हिं.स.)।पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर हद्दीत बरेच दुचाकी व चारचाकी वाहनचालक हे बनावट नंबर प्लेटचा वापर करुन, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बनावट नंबरप्लेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी वाहतुक विभागास आदेशित केलेले आहे.
वाहतुक विभागातर्फे दैनंदिन वाहतूक नियमन करत असतांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. दिनांक २६/०७/२०२५, रोजी बी एस एन एल चौक येथे वाहतुक विभागाचे अंमलदार हे वाहतूक नियमन करीत असतांना तेथे महींद्रा एसयूव्ही कंपनीचे चार चाकी वाहन क्र. एमएच ४६-बी-६५ हे वाहन संशयीत वाटल्याने नमुद वाहन थांबवुन त्यांचे कागदपत्राची विचारणा केली असता त्यांचेकडे नमुद वाहन क्रमांकाचे कागदपत्रे नव्हते. नमुद वाहन चालकास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने महींद्रा एसयूव्ही कंपनीचे वाहन क्र. एमएच-४६-बी-६४६५ या वाहनाचे खरे कागदपत्र दाखविले. सदर वाहन चालक हा वाहन क्र. एमएच-४६-बी-६५ असा बनावट नंबर प्लेटचा वापर करुन, वाहन चालवित असतांना मिळुन आल्याने नमुद वाहन चालक व त्यांचे वाहन ताब्यात घेवुन, नमुद वाहन चालकांविरुध्द पो.स्टे. क्रांतीचौक येथे गुरनं. १८८/२०२५ कलम ३१८ (२), ३१८(४) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही प्रविण पवार, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर, म शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर, धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अमोल देवकर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा-१ व शहर वाहतूक शाखा-१ येथील नेमणुकीस असलेले मपोह/११६ निशा खरतडे, पोशि/२५७१ सुरासे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis