जळगाव - मांस विक्री करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल
जळगाव, 30 जुलै, (हिं.स.) - रावेर शहरातील सावदा रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री करून अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १० जणांविरोधात रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आ
जळगाव - मांस विक्री करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल


जळगाव, 30 जुलै, (हिं.स.) - रावेर शहरातील सावदा रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री करून अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १० जणांविरोधात रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आभोडा येथील अजित नजीर तडवी, रावेर येथील शेख जाहिद शेख ताहेर, शेख रशीद शेख नजीर, शेख सलमान शेख हरुन, नुर मोहम्मद शेख नईम, मोहम्मद रेहान अब्दुल जाहिद, शेख तनवीर अब्दुल वहाब, अशोक भिमराव अटकाळे (भोकरी), अशपाक अलताफ खाटीक (फतेनगर) आणि शेख समीर शेख ताहेर खाटीक (इमामवाडा) हे सर्वजण २८ जुलै रोजी रावेर-सावदा रस्त्यावर उघड्यावर मांस विक्री करत होते. या उघड्यावरील मांस विक्रीमुळे सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण होत होती, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते. तसेच, मांस विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे या मार्गावरील वाहतुकीचा सतत खोळंबा होत होता आणि पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. या प्रकाराबाबत पोका. विकारोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०५ अन्वये वरील १० विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande