सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा अर्ध नग्न मोर्चा
सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)। आत्मभान आंदोलन अंतर्गत भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय-अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्ध नग्न मोर्चा काढून लक्ष वेधले. शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धरण करत आत्मभान मूक आंदोलनात शे
सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा अर्ध नग्न मोर्चा


सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।

आत्मभान आंदोलन अंतर्गत भीमसैनिकांनी एकत्रित येऊन अन्याय-अत्याचार विरोधी युवा कृती संघटनेच्या माध्यमातून अर्ध नग्न मोर्चा काढून लक्ष वेधले. शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धरण करत आत्मभान मूक आंदोलनात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करत आत्मभान मूक आंदोलनाला सुरुवात झाली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांतता रॅली काढण्यात आली.दरम्यान परभणी कोम्बिंग ऑपरेशन आणि शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande