बेंगळुरू, 21 डिसेंबर (हिं.स.) : कर्नाटकच्या बंगळूरजवळ कार आणि कंटेनरमध्ये आज, शनिवारी झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील इगाप्पागोळे कुटुंबातील सर्वजण कारने प्रवास करीत होते. यावेळी कंटेनर आणि कार यांच्या भीषण अपघात झाला. इगाप्पागोळे यांच्या कार कंटनेनर आखील आल्यामुळे चेंदामेंदा झाला. मृतांमध्ये चंद्रम इगाप्पागोळ, धोराबाई इगाप्पगोळ, गण इगाप्पगोळ, आर्या इगाप्पागोळ, विजयालक्ष्मी इगाप्पागोळ यांचा समावेश आहे. चंद्रम इगाप्पागोळे हे जत तालुक्यातील मोराबागदी येथील रहिवासी आहेत. ते एकाच सॉफ्टवेअर कंपनीचे मालक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. तसेच इगाप्पागोळ कुटुंबीय ख्रिसमस सुट्टीसाठी जतकडे येत होते. यावेळी बेंगलोरजवळ हा भीषण अपघात झाला.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी