सोलापूर, 21 डिसेंबर (हिं.स.)।
जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून रेल्वे धावणार आहेत. यात गाडी क्रमांक (०६२०७/०८) म्हैसूर-दानापूर विशेष एक्स्प्रेस सोलापूरमार्गे सोडण्याचा निर्णय दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाने घेतल्याने सोलापूरच्या भक्तांची महाकुंभ मेळाव्यासाठी जाण्याची सोय झाली आहे.
दरम्यान, सोलापूरवरून कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळ्यात गर्दी असते. या मेळ्यात अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
पण, सोलापूरहून थेट रेल्वे जरी नसली तरी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून म्हैसूर-दानापूर एक्स्प्रेस सोलापूरमार्गे धावणार असल्याने सोलापूरकरांना कुंभमेळ्याला जाण्याची सोय झाली आहे. ही गाडी १८ जानेवारी, १५ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२५ रोजी शनिवारी दुपारी साडेचार वाजता म्हैसूर स्थानकावरून निघेल.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड