रशियाच्या कझानमध्ये युक्रेनचा ड्रोनहल्ला 
मास्को, 21 डिसेंबर (हिं.स.) : रशियाच्या कझान शहरात आज, शनिवारी पहाटे युक्रेनने ड्रोन हल्ला केला. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्यासारखा हा हल्ला आहे. मास्को शहरापासून 800 किलोमीटर लांब असलेल्या कझान शहरातील उंच
रशियाच्या कझानमध्ये युक्रेनचा ड्रोन हल्ल्याचे छायाचित्र


मास्को, 21 डिसेंबर (हिं.स.) : रशियाच्या कझान शहरात आज, शनिवारी पहाटे युक्रेनने ड्रोन हल्ला केला. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्यासारखा हा हल्ला आहे. मास्को शहरापासून 800 किलोमीटर लांब असलेल्या कझान शहरातील उंच टॉवर्सवर 8 ड्रोन धडकल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्‍ये ड्रोन इमारतींना धडकल्‍याचे दिसत आहे. या हल्ल्यांनंतर रशियाचा 2 विमानतळे बंद करण्यात आली आहेत.

रशियात 4 महिन्‍यांपूर्वी साराटोव्‍हा शहरातील व्होल्गा स्काय या 38 मजली निवासी इमारतीवरही अशाच प्रकारचा हल्‍ला झाला होता. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले होते. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर 100 मिसाईल आणि 100 ड्रोन डागले होते. यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 150 हून अधिक जण जखमी झाले होते. जागतिक व्यासपीठावर युक्रेनच्या हल्ल्याकडे आश्चर्याने पाहिले जात आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे 2 दिवसांपूर्वी सांगितले होते. यासाठी ते ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार आहेत. पुतीन म्हणाले होते की, ट्रम्‍प यांच्‍याशी 4 वर्षांहून अधिक काळ चर्चा झालेली नाही; पण ट्रम्प यांची इच्छा असेल तर ते त्यांना भेटण्यास तयार आहेत. तसेच कोणत्‍याही अटीशिवाय युद्ध थांबवण्याबाबतच्‍य चर्चेस तयार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. यानंतर युक्रेनने केलेल्‍या हल्‍ल्‍यामुळे आता शांती प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता असून रशिया काय कारवाई करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande