मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)।अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री, यांनी ६९व्या रेल्वे सप्ताह (अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार - AVRSP) कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीसाठी क्षेत्रीय रेल्वेंना २२ शिल्ड्स प्रदान केली. तसेच १०१ पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कृत केले. सदर कार्यक्रम भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
मध्य रेल्वेसाठी हा अभिमानाचा क्षण होता कारण धरम वीर मीना, महाव्यवस्थापक यांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते एकूण उत्तम कार्यक्षमतेसाठी प्रतिष्ठित असलेले गोविंद वल्लभ पंत शिल्ड्सह ५ क्षेत्रिय शिल्ड्स मिळाले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय मंत्र्यांनी ७ मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पुरस्कारही प्रदान केले.
धरम वीर मीना, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी जगमोहन गर्ग, अतिरिक्त महाव्यवस्थापक व प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक यांच्यासह सर्व रेल्वे झोनमधील एकूण कार्यक्षमतेसाठी प्रतिष्ठित गोविंद वल्लभ पंत (उत्तर पूर्व रेल्वेसह संयुक्तपणे) शिल्ड स्विकारले.
हे पुरस्कार कार्यात्मक आणि प्रशासकीय उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन दर्शवतात.
खालील दिलेल्या माहितीनुसार, महाव्यवस्थापकांनी संबंधित विभागाच्या प्रधान प्रमुखांसह ५ शिल्ड्स स्विकारले:
१. एस एस गुप्ता, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक यांच्यासह वाहतूक नियोजन शिल्ड्
वाहतूक व्यवस्था कार्यक्षमतेने परीचलनासाठी मध्य रेल्वेच्या विशेष प्रयत्नांवर प्रकाश टाकल्याबद्दल पुरस्कार.
२. जगमोहन गर्ग, प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक यांच्यासह भांडार व्यवस्था शिल्ड
सूक्ष्म नियोजन आणि विशेष कामगिरीसाठी पुरस्कृत.
३. सुबोध कुमार सागर, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता यांच्यासह पर्यावरण आणि स्वच्छता पदक
आपल्या कार्यक्षेत्रात स्वच्छतेचे मापदंड आणि पर्यावरणास अनुकूल पद्धती राखल्याबद्दल पुरस्कृत.
४. शिवराम, प्रधान मुख्य विद्युत अभियंता यांच्यासह विद्युत अभियंता शिल्ड
विद्युत अभियांत्रिकी परीचालन आणि नवकल्पनांमध्ये उत्कृष्टतेसाठी पुरस्कृत. (पूर्व कोस्ट रेल्वेसह संयुक्तपणे)
५. अवनीश कुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम शिल्ड
पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पुरस्कृत (दक्षिण मध्य आणि पूर्व मध्य रेल्वेसह संयुक्तपणे).
वर्ष २०२४ साठी, ७ मध्य रेल्वे अधिकाऱ्यांना (२ अधिकारी व ५ कर्मचारी) उत्कृष्ट सेवांकरीता सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१. हेमंत जिंदल, उपमुख्य दक्षता अधिकारी, यांना नवकल्पना/प्रक्रिया/प्रक्रियेसाठी पुरस्कृत करण्यात आले, ज्यामुळे अर्थव्यवस्था, उत्पादन, आयात प्रतिस्थापन इ. सुधारणा करण्याकरीता.
२. सुधा वेदप्रकाश द्विवेदी, ट्रेन तिकीट निरीक्षक, यांना महसूली उत्पन्न वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास टाळण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
३. राहुल अग्रवाल, वरिष्ठ विभागीय अभियंता,
४. मिलिंद खडक्कर, स्टेशन अधीक्षक,
५. संजीव कौतिक पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक सिग्नल मेंटेनर) आणि
६. पवन नीना फिरके, सहाय्यक/ C&W (खलाशी सहाय्यक) यांना परिचालन, सुरक्षा, सुरक्षितता, उत्तम देखभाल आणि मालमत्तेचा वापर सुधारण्यासाठी केलेल्या अनुकरणीय कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.
७. व्ही एम माशीदकर, मुख्य आगार साहित्य अधीक्षक यांना प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.
हे प्रतिष्ठित पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट योगदानाची महती दर्शवितात आणि इतरांना त्यांच्या दैनंदिन कामात उत्तम कामगिरीसाठी प्रयत्न करण्यास प्रेरित करतात. वास्तविक प्रयत्नांना बळ देऊन, हे पुरस्कार कठोर परिश्रम आणि समर्पण यांचे मौल्यवान आणि कौतुकास्पद कामगिरीसाठी प्रेरणा देतात.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने