सोलापूर : महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ, रस्त्यांवर अतिक्रमण लागले थाटू
सोलापूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।महापालिका प्रशासनाने महिनाभर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम घेतली. स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरातील छोटे-मोठे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. आता महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ, रस्त्यांवर अतिक्रमण थाटू लागले आहे. साहित्य जप्तीनंतर नव
सोलापूर : महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ, रस्त्यांवर अतिक्रमण लागले थाटू


सोलापूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।महापालिका प्रशासनाने महिनाभर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम घेतली. स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरातील छोटे-मोठे अतिक्रमण काढून टाकण्यात आले. आता महिनाभरानंतर पुन्हा फुटपाथ, रस्त्यांवर अतिक्रमण थाटू लागले आहे. साहित्य जप्तीनंतर नव्याने खोके उभारत आहेत.

व्यापाऱ्यांना नेमके कोणाचे अभय मिळते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात राजकीय व वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. महापालिकेकडे २७ मंडईंची नोंद आहे. त्यातील फक्त १३ मंडई अधिकृत आहेत. महापालिकेकडून मंडईच्या देखभाल व दुरुस्ती मंडई ओस पडली.

व्यापारी रस्त्यावर बाजार थाटू लागले. प्रशासक काळात याकडे लक्ष देण्यात आले. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंडईची दुरुस्ती करून ओट्यांचा लिलाव केला. मात्र ओट्यांचा ताबा घेऊनही व्यापारी बाजार मात्र रस्त्यावर कायम सुरू राहिला.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande