चंद्रपूर : पशुगणना प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखा - जिल्हाधिकारी
चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाने 21 वी पशुगणना संपुर्ण भारतभर सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पशुगणना ग्रामीण व शहरी भागामध्ये करण्यात येत असून 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी हा पशुगणनेचा कालावधी आहे. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रक
चंद्रपूर : पशुगणना प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखा - जिल्हाधिकारी


चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।केंद्र शासनाने 21 वी पशुगणना संपुर्ण भारतभर सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पशुगणना ग्रामीण व शहरी भागामध्ये करण्यात येत असून 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी हा पशुगणनेचा कालावधी आहे. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या पशुधनाची गणना प्रगणक व पर्यवेक्षक मोबाइलवरून करणार आहेत. या पशुगणनेच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात 21 वी पशुगणना 2024 अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व संनियत्रण समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande