चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।
केंद्र शासनाने 21 वी पशुगणना संपुर्ण भारतभर सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पशूगणना ग्रामीण व शहरी भागामध्ये करण्यात येत असून 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 हा पशुगणनेचा कालावधी आहे.
पशुगणनेत गौशाळा तसेच भटक्या जनावरांची माहिती अंतर्भुत केली जाणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाच्या गणनेसाठी 163 ग्रामीण व 53 शहरी असे एकुण 216 प्रगणक तर 44 पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. गणनेचा दैनंदिन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभाग तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तालुकास्तरावरील यंत्रणांची बैठक घ्यावी. पशुगणनेसाठी पशुपालकांचे सहकार्य घ्यावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत.
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव