चंद्रपूर - बंदी बाधंवाकरीता शेळीपालन तर, महिला बंदीकरीता शिवणकला प्रशिक्षण
चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा कारागृहातील बंद्याकरिता व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. बंदी बाधंवाकरीता शेळीपालन तर महिला बंदीकरीता शिवणकला प्रशिक्षण देण्यात आले. कारागृह सेवा ही अत्यंत संवेदनशिल सेवा असुन कारागृहामध्ये वेगवेग
चंद्रपूर - बंदी बाधंवाकरीता शेळीपालन तर, महिला बंदीकरीता शिवणकला प्रशिक्षण


चंद्रपूर, 22 डिसेंबर (हिं.स.)।

जिल्हा कारागृहातील बंद्याकरिता व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. बंदी बाधंवाकरीता शेळीपालन तर महिला बंदीकरीता शिवणकला प्रशिक्षण देण्यात आले.

कारागृह सेवा ही अत्यंत संवेदनशिल सेवा असुन कारागृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी बंदीस्त असतात. कारागृहामध्ये येणाऱ्या बंद्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये बदल घडवून बंद्यात सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीने कार्य करण्यात येते. तसेच सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रीदवाक्य असून कारागृहातील बंद्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.

अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा पुणेचे महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्या संकल्पनेतून, (कारागृह) मुख्यालय पुणेचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर आणि पूर्व विभाग नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कारागृह अधिक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या प्रयत्नातून बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी व चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहामध्ये बंदी बाधंवाकरीता शेळीपालन तर महिला बंदीकरीता शिवणकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीष धायगुडे म्हणाले, कारागृहातून बंदी बाहेर पडल्यानंतर त्यास उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया स्टार आरसेटी अंतर्गत सुरु असलेले शेळीपालन आणि शिवणकला सारखे व्यावसायिक प्रशिक्षण स्वयंरोजगारासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर राजू नंदनवार यांनी शेळीपालन प्रशिक्षणाची माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande