कॅनबेरा , 25 डिसेंबर (हिं.स.)।भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी हा सामना गुरुवार (26 डिसेंबर) खेळवला जाणार आहे.मेलबर्नच्या स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर यजमान संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. दुखापतग्रस्त जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे, तर नॅथन मॅकस्वानी याच्या जागी 19 वर्षांच्या सॅम कोन्स्टास याला संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. टीम सिलेक्शनवेळी ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात फेल ठरणाऱ्या नॅथन मॅकस्वानीला बसवण्यात येत आहे. नॅथन मॅकस्वानी याच्या जागी 19 वर्षांच्या सॅम कोन्स्टास याला संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सॅम कोन्स्टास हा बॉक्सिंग डे टेस्टमध्ये खेळताना दिसेल.२०११ मध्ये जोहान्सबर्ग येथे कर्णधार पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरल्यापासून कॉन्स्टास ऑस्ट्रेलियाचा सर्वात तरुण कसोटी पदार्पण करणारा खेळाडू होण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.
ट्रॅव्हिस हेडला आता तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.ट्रेव्हिड हेड गाबा टेस्ट दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो दोनही टेस्ट खेळणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता दोन्ही टेस्टसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित मानलं जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash