बॉक्सिंग डे कसोटीत सॅम कोन्स्टासनं नावे केला एक खास विक्रम
कॅनबेरा , 26 डिसेंबर (हिं.स.)। मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटीत १९ वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास याला ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पण करताच त्याने १२८ वर्षे जुना विक
प्लास्टिक


कॅनबेरा , 26 डिसेंबर (हिं.स.)। मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटीत १९ वर्षीय खेळाडू सॅम कॉन्स्टास याला ऑस्ट्रेलियन संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पण करताच त्याने १२८ वर्षे जुना विक्रम मोडला.आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात त्याने ६० धावांची दमदार खेळी केली आहे. सॅम कोन्स्टास हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामना खेळणारा चौथा सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे. त्याबरोबर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पणात अर्धशतक करणारा तौ चौथा सलामीवीर ठरला आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी, ऑस्ट्रेलिया संघांच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला.ऑस्ट्रेलिया संघाने नॅथन मॅकस्विनी याच्या जागी १९ वर्षीय सॅम कोन्स्टासचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टास याने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.ऑस्ट्रेलियाकडून बॉक्सिंग डेच्या दिवशी सॅम कोन्स्टासला आंतरारष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. या संधीच सोन करताना त्याने अर्धशतकी खेळी केली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पणात अर्धशतक करणारा तौ चौथा सलामीवीर ठरला. याआधी वेस्टइंडिजचा रॉय फ्रेडरिक्स, भारताचा मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियाच्या एड कोवन यांचा सामावेश आहे. फ्रेडरिक्सनं १९६८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७६ धावांची खेळी केली होती. मयंक अग्रवालनं २०१८ मध्ये ७६ धावांची खेळी साकारली होती. कोवन याने २०११ मध्ये ६८ धावांची खेळी केली होती.

सॅम कोन्स्टास हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामना खेळणारा चौथा सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विक्रम हा इयान क्रेग या दिग्गजाच्या नावे आहे. १९५३ मध्ये १७ वर्ष २२९ दिवस वय असताना या क्रिकेटरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्नच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्स याने २०११ मध्ये जोहान्सबर्घच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळला होता. १८ वर्षे १९३ दिवस वय असताना तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मैदानात उतरला होता. टॉम गेरेट या दिग्गजानं १८७७ मध्ये मेलबर्नच्या मैदानात १८ वर्षे २३२ दिवस वय असताना पदार्पणाचा सामना खेळला होता. या यादीत आता १९ वर्षे ८५ दिवस वयासह सॅमची एन्ट्री झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Avinash


 rajesh pande