आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने यश मिळाले - माधुरी मिसाळ
पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)। जेव्हा संकट येते तेव्हा लोकं असा विचार करतात की अरे देवाने हे काय माझ्या नशिबात दिले, पण देव आपल्या साठी जे चांगलं करतो ते आपण लक्षात ठेवत नाही. मी मात्र आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने आणि त्या त्
Maduri maisal slksdfsdf


पुणे, 26 डिसेंबर (हिं.स.)।

जेव्हा संकट येते तेव्हा लोकं असा विचार करतात की अरे देवाने हे काय माझ्या नशिबात दिले, पण देव आपल्या साठी जे चांगलं करतो ते आपण लक्षात ठेवत नाही. मी मात्र आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने आणि त्या त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेल्याने मला यश मिळाले, असे भाजप आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या.

क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने त्यांचा कौटुंबिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.त्यांचा सत्कार त्यांच्या शाळेतील 90 वर्षांच्या पद्मा लाहोटी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल व शतपैलू सावरकर हे पुस्तक देऊन करण्यात करण्यात आला.

माझे दीर म्हणतात की वक्त से पहले और किस्मत से ज्यादा कुछ नहीं मिलता यावर माझा ठाम विश्वास असून जे घडायचं ते घडतंच त्यामुळे खचून न जाता आलेल्या प्रसंगावर मात करत पुढे जायचे असते असे ही माधुरीताई म्हणाल्या. मी शांतपणे परिस्थिती हाताळायला शिकले ह्याला माझ्या शाळेतील एक प्रसंग कारणीभूत आहे असे सांगताना त्या म्हणाल्या की परीक्षेच्या आधी एका विद्यार्थिनीने माझी वही फाडली, तेव्हा माझ्या आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तपस्वी बाई म्हणाल्या की अजून परीक्षेला तीन दिवस आहेत, तू पुन्हा सगळे लिहून काढ, तुझी उजळणी पण होईल, हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला असे माधुरीताई यांनी स्पष्ट केले. तसेच संदीप माझा भाऊ असून आम्ही सगळ्यांनी आयुष्यातील मोठा काळ एकत्र काढल्याचेही त्या म्हणाल्या.

माधुरी ही शाळेत असताना नेहमीच पहिली यायची ती खूप हुशार आणि समजूतदार होती असे त्यांच्या शाळेतील शिक्षिका पद्मा लाहोटी बाई म्हणाल्या.माधुरी चुणचुणीत विद्यार्थीनी होती असे सांगतानाच आज तिचा सत्कार करताना अतीव आनंद होत आहे, असेही लाहोटी बाई म्हणाल्या.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande