हिमाचलमध्ये बर्फवृष्टीअनुभवण्यासाठी 3 लाख पर्यंटक
अवघ्या 48 तासात 81 हजार वाहनांच्या लागल्या रांगा शिमला, 27 डिसेंबर (हिं.स.) : यंदाच्या मोसमातील बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. राज्यात 24 ते 26 डिसेंबर या 48 तासांच्या कालावधीत 81 हजार वाहनांमधून 3 लाख प
हिमाचलप्रदेशात बर्फवृष्टीचा आनंद घेताना पर्यटक


अवघ्या 48 तासात 81 हजार वाहनांच्या लागल्या रांगा

शिमला, 27 डिसेंबर (हिं.स.) : यंदाच्या मोसमातील बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेशात पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. राज्यात 24 ते 26 डिसेंबर या 48 तासांच्या कालावधीत 81 हजार वाहनांमधून 3 लाख पर्यटक पोहचल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान हवामान खात्याने 28 डिसेंबरपर्यंत जोरदार हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पर्यटकांना उंच भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यात सर्वाधिक पर्यटक शिमल्यात पोहोचले असून पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सुमारे 2 लाख पर्यटक 65 हजार वाहनांतून येथे आले आहेत. कुल्लू जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 2 दिवसांत 16 हजार वाहनांतून सुमारे 1.25 लाख पर्यटक पोहोचले आहेत. कुल्लू आणि मनाली व्यतिरिक्त जवळपासच्या पर्यटनस्थळीही लोकांची गर्दी उसळली आहे. एकीकडे पर्यटक पॅरा ग्लायडिंग, स्नो-बाईक रायडिंग, स्कीइंग, घोडेस्वारी, नारकंडा, महासू पीक, कुफरी येथे याक रायडिंग करत आहेत तर दुसरीकडे शिमल्याच्या महासू शिखरावरून दुर्बिणीद्वारे वर्फवृष्टीच्या दृष्यांचा आनंद घेत आहेत.

--------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande