संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून करण्यात आलाय - अंजली दमानिया
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.) - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापले आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची
अंजली दमानिया


बीड, 28 डिसेंबर (हिं.स.) - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापले आहे. यातील आरोपी वाल्मिक कराड यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून केली जातं आहे. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दमानिया यांनी मोठे आणि अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

अंजली दमानिया यांनी म्हटले की, जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होणार नाही, तोपर्यंत मी ठिय्या करणार आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडू. दरम्यान दमानिया यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत बराच वेळ चर्चा केली. दमानिया यांनी असेही म्हटले की, मला व्हॉटसअॅप कॉल आले. यासोबतच मला मेसेजही पाठवण्यात आली की, संतोष देशमुख यांच्या हत्येतील तीन आरोपींचा खून करण्यात आलाय. कर्नाटकच्या सीमेवर त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, ते मेसेज लगेचच डिलीट करण्यात आले. ते मेसेज कोणी पाठवले हे मला माहिती नाही. मी याबद्दलची सर्व माहिती आणि नंबर एसपींना दिले आहेत. दमानिया यांच्या दाव्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे. याबद्दल पोलिसांनी पुढील तपास केला की, नाही याची कल्पना आपल्याला नसल्याचे देखील अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.

दमानिया यांनी असेही म्हटले की, जोपर्यंत या हत्येतील आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत मी बीडला राहणार आहे. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणीच दमानिया यांनी केली आहे. काल वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सीआयडीकडून दोन तास चाैकशी करण्यात आली आहे. सतत वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणीही केली जातं आहे. या घटनेबद्दल बोलताना धनंजय मुंडे यांनी थेट म्हटले होते की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच झाली पाहिजे, हीच माझी भूमिका आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande