मनमोहन सिंगांच्या समधीसाठी काँग्रेसनेमागितली जागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना पाठवले पत्र नवी दिल्ली, 27 डिसेंबर (हिं.स.) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रध
मल्लिकार्जुन खर्गे


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांना पाठवले पत्र

नवी दिल्ली, 27 डिसेंबर (हिं.स.) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे.

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या,शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी काँग्रेस कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली. माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून त्यांच्या निवासस्थानी फुलांनी सजवलेल्या शवपेटीमध्ये ठेवण्यात आले होते. याठिकाणी नेत्यांनी मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि इतर कुटुंबीयही उपस्थित होते. दरम्यान काँग्रेसने सरकारकडे मनमोहन शिंग यांच्या समाधीसाठी जागेची मागणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागेची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र दिले असून गृहमंत्री शाह यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande