निवडणूक लढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते - सुनेत्रा पवार
पुणे 28 मार्च (हिं.स) : मला कधी स्वप्न पडले नव्हते की मी निवडणुकीला उभी राहीन आणि तुम्ही मला मतदान
निवडणूक लढेल असे स्वप्नातही वाटले नव्हते - सुनेत्रा पवार


पुणे 28 मार्च (हिं.स) : मला कधी स्वप्न पडले नव्हते की मी निवडणुकीला उभी राहीन आणि तुम्ही मला मतदान कराल. मी केवळ माझ्या समाधानासाठी काटेवाडीकरांसाठी काम केले. त्यामुळे माझी तुमच्या कोणाकडूनही काही अपेक्षा नाही. तुम्ही जे आजपर्यंत प्रेम दिले तेच माझ्यासाठी खूप आहे, अशा शब्दात बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्वतःच आपल्या उमेदवारीचे सुतोवाच केले. काटेवाडी येथे गाव संपर्क दौऱ्यानिमित्त सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी त्या म्हणाल्या की, मी तुम्हाला काही मागायला आहे आले आहे अशातला भाग नाही. मी यापूर्वी जे काटेवाडीकरांसाठी काम केले ते काही निवडणुकीसाठी केले नव्हते. त्यावेळी मला याची कल्पना देखील नव्हती.आज जे काही होत आहे ते तुम्हाला ठाऊक आहे. आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आज आणून ठेवली आहे. लोकसभा विधानसभा या निवडणुका दर पाच वर्षांनी होतच असतात. मात्र, यावेळी ची निवडणूक वेगळी आहे. मात्र, काटेवाडी करांना चांगले ठाऊक आहे. आपल्याला कुठे जायचे आहे. आपल्यासाठी काय भलं आणि काय बुरं आहे याची देखील कल्पना तुम्हाला आहे. त्यामुळे मला काही तुम्हाला जास्त फोड करून सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही माझ्या घरातील माणसे आहात. फक्त मी एवढेच सांगेन की घड्याळ तेच आहे. मात्र, वेळ नवी आहे, असे सांगून सुनेत्रा पवार यांनी अप्रत्यक्षपणे काटेवाडीकरांना आपल्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande