मुंबई ते गोरखपूर दरम्यान शिक्षक विशेष ट्रेन
मुंबई, 28 मार्च (हिं.स.) मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या गर्दीत दादर ते गोरखपूर दरम्यान शिक्षकांसाठी २ पूर
मुंबई ते गोरखपूर दरम्यान शिक्षक विशेष ट्रेन


मुंबई, 28 मार्च (हिं.स.) मध्य रेल्वे उन्हाळ्याच्या गर्दीत दादर ते गोरखपूर दरम्यान शिक्षकांसाठी २ पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत.

01101 शिक्षक विशेष दादर येथून दि. ०२.०५.२०२४ रोजी १४.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता गोरखपूर येथे पोहोचेल.

01102 शिक्षक विशेष गोरखपूर येथून दि. १०.०६.२०२४ रोजी १४.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०३.३० वाजता दादर येथे पोहोचेल.

थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, रानी कमलापति स्टेशन, बीना, ललितपुर, टीकमगढ़, खड़गपुर, महाराजा छत्रसाल स्टेशन छतरपुर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कर्वी, मानिकपुर, प्रयागराज जंक्शन, ज्ञानपुर रोड, वाराणसी, ओंरिहार, मऊ, भटनी, देवरिया सदर.

संरचना : एक वातानुकूलित-द्वितीय, तीन वातानुकूलित -तृतीय, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.

आरक्षण : शिक्षकांच्या विशेष ट्रेनसाठी बुकिंग क्र. दि. ०२.०५.२०२४ रोजी दादर येथून सुटणारी 01101 आणि दि. १०.०६.२०२४ रोजी गोरखपूर येथून सुटणारी 01102 विशेष शुल्कावर दि. ३१.०३.२०२४ रोजी १४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील नामांकित काउंटरवर उघडेल.

शिक्षकांसाठी विशेष गाड्यांचे बुकिंग केल्यानंतर, निवास उपलब्ध असल्यास, बुकिंग दि. ०१.०४.२०२४ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वर इंटरनेटद्वारे सर्वसामान्यांसाठी खुले असेल.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande