भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान
भंडारा, १८ एप्रिल, (हिं.स.) : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान


भंडारा, १८ एप्रिल, (हिं.स.) : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके सकाळपासून रवाना होत आहे.

मतदार संघात 2133 मतदान केंद्र असून 18 लाख 27 हजार हि मतदारांची संख्या आहे. त्यामध्ये नऊ लक्ष 97 हजार भंडारा जिल्ह्यातील तर आठ लक्ष 30 हजार गोंदिया जिल्ह्यातील मतदारांची संख्या आहे. 180 बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान पथकांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande