रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे २१ एप्रिलला रक्तदान शिबिरे
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्
रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे २१ एप्रिलला रक्तदान शिबिरे


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे येत्या २१ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

गेल्या १९९९ पासून सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध आदेश पथक, अनिरुद्ध समर्पण पथक, दिलासा मेडिकल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तसेच संलग्न संस्थांतर्फे दरवर्षी एप्रिलमध्ये एक मोठे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. आतापर्यंत झालेल्या महारक्तदान शिबिराद्वारे सुमारे एक लाख ८८ हजार युनिट रक्त जमा केले आहे.

यावर्षी २१ एप्रिल रोजी मुंबई, रत्नागिरी जिल्हा त्याचबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खालील ठिकाणी रक्तदान शिबिर होईल. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील रक्तदान शिबिराची ठिकाणे अशी -

१) गुहागर : साई मंदिर, कुलस्वामिनी चौक, गुहागर, वेळ : स.१०.०० ते दु ४.००, संपर्क : 1) राजेंद्रसिंह आरेकर - 09764426395 2) संजीवसिंह ढेपसे – 9969076244.

२) चिपळूण: दत्तमंदिर, खेर्डी वेळ : १०.०० ते ४.००, संपर्क - संजयसिंह आळवे – 9422054111

३) खेड : एल पी इंग्लिश स्कूल, एसटी स्टँडजवळ, वेळ : स. ९.३० ते दु. २.३०, संपर्क : अभिजितसिंह पाटणकर – 9028461711

४) लोटेमाळ : परशुराम हॉस्पिटल, घाणेकुंट, लोटेमाळ, वेळ : स १०.०० ते दु. १.००, संपर्क : सुनीलसिंह उतेकर – 9850528275

५) दापोली : चैतन्य सभागृह, आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर, दापोली, वेळ- स. १०.०० ते दु ४.००, संपर्क : मुकेश कालेकर – 9226173890

६) जैतापूर : प्राथमिक आरोग्य विभाग, जैतापूर, ता. राजापूर, वेळ : स. ९.०० ते दु. १.०० . संपर्क - राकेशसिंह दांडेकर – 092724 37914

७) विलवडे, ता. लांजा : जिल्हा परिषद पूर्ण केंद्र प्राथमिक शाळा, विलवडे, वेळ : स. ९.०० ते दु. २.००, संपर्क:- विकाससिंह लाड - 086689 50811

८) देवरूख : श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, मोदक उद्यानाजवळ, देवरूख, वेळ : स. १०.०० ते दु. १.०० संपर्क:- गिरीशसिंह गानू – 9960558398

९) रत्नागिरी : अतुलित बलधाम, नाचणे, टीआरपी, २८-०४-२०२४ रोजी स. १०.०० ते दु. ४.००, संपर्क : दीपकसिंह सावंत - 9421139489

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande