रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्यावर करपा रोगाची भीती
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : जिल्ह्यात काल पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वातावरणात गारवा
रत्नागिरीत अवकाळी पावसामुळे आंब्यावर करपा रोगाची भीती


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : जिल्ह्यात काल पहाटे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसाने हापूस आंब्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

काल पहाटे अर्धा तास जोरदार पाऊस पडला. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागात ८.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला असून, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आंब्यावर करपा रोगाचे काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच देठकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल. यासाठी अझॉक्सिस्ट्राबिन २३.५ ईसी १० मिली. प्रति १० लिटर पाण्यात या बुरशीनाशकाची स्टिकर मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हेक्टरी ४ नग रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या खालील बाजूंच्या फांद्यांवर लावावेत.

फळगळ झालेली आंबाफळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावीत. तयार झालेली आंबाफळे काढताना सकाळी १० व संध्याकाळी ४ नंतर नूतन झेल्याच्या साहाय्याने काढणी करावी. काढणीपश्चात बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी काढलेली फळे लगेचच ५०० सेल्सिअस पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर सावलीत वाळवावीत. तसेच फळांची वाहतूक करताना रात्रीच्या वेळीस करावी, असे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande