धुळे - गेल्या महिन्याभरात 2 कोटी 41 लाखाचा मुद्देमाल जप्त
धुळे, 18 एप्रिल, (हिं.स.) - आचारसंहिता घोषित झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार लिटरपेक्षा अधिक
धुळे - गेल्या महिन्याभरात 2 कोटी 41 लाखाचा मुद्देमाल जप्त


धुळे, 18 एप्रिल, (हिं.स.) - आचारसंहिता घोषित झाल्यापासून जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार लिटरपेक्षा अधिक मद्य जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत साधारणत: 67 लाख रुपये आहे. तसेच 27 लाख रुपयांपेक्षा अधिकचे गांजा आणि अफु जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारे गेल्या महिन्याभरात 2 कोटी 41 लाख रुपयांच्यावर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून 2 पिस्तुल, तलवारी आदि जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील 542 शस्त्र परवानाधारकांपैकी 525 शस्त्रे जमा करण्यात आली असून उर्वरित 17 शस्त्र जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचप्रमाणे आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मध्यप्रदेश सीमेवर 6 तर गुजरात सीमेवर 3 अशी एकूण 9 तपासणी नाके कार्यरत करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande