सीएसएमटी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या ओएचई कामांसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म विस्तार
CSMT


मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामाच्या संदर्भात प्रारंभिक ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) कामांसाठी २ विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालीत करणार आहे.

चालवल्या जाणाऱ्या ब्लॉक्सचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

ब्लॉक दिनांक : २ स्वतंत्र ब्लॉक्स चालू

दि. १९/२०.०४.२०२४ (शुक्र/शनि रात्री) आणि

दि. २०/२१.०४.२०२४ (शनि/रवि रात्री)

ब्लॉक कालावधी : मध्यरात्री १२:३० ते सकाळी ०४:३० (दोन्ही दिवशी प्रत्येकी ४ तास)

वाहतूक ब्लॉक विभाग :

भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर

वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन्स

(७वी लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस शंटिंग नेकसह)

मेल/एक्स्प्रेस गाड्या स्थगित :

खालील गाड्या दादर स्थानकावर स्थगित केल्या जातील.

12870 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस

12052 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस

22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्स्प्रेस

11058 अमृतसर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस

11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस

12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल

ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे काम :

ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

दि. १९/२०.०४.२०२४ (शुक्रवार/शनिवार) आणि दि.२०/२१.०४.२०२४ (शनिवार/रविवार) रोजी मुख्य लाइनवर

ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून डाउन धीमी लाईन N1 शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१४ कसारा करिता सुटेल आणि कसारा येथे ०३:०० वाजता पोहचेल.

ब्लॉक नंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०४:४७ कर्जत करिता सुटेल आणि ०६:०७ वाजता कर्जत येथे पोहचेल.

अप स्लो लाईनवरून ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल S52 कल्याण येथून २२:३४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्यरात्री ००:०६ वाजता पोहचेल.

ब्लॉक नंतर पहिली लोकल अप स्लो लाईनवर T2 ठाणे येथून ०४:०० सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:५६ वाजता पोहचेल.

हार्बर लाईनवर दि. १९/२०.०४.२०२४ (शुक्रवार/शनिवार) आणि दि. २०/२१.०४.२०२४ (शनिवार/रविवार)

ब्लॉक पूर्वीची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००:१३ सुटेल आणि पनवेल येथे ०१:३३ वाजता पोहचेल.

ब्लॉक नंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४:५२ सुटेल आणि पनवेल येथे ०६:१२ वाजता पोहचेल.

ब्लॉक पूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून २२:४६ सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ००:०५ वाजता पोहचेल.

ब्लॉक नंतरची शेवटची लोकल वांद्रे येथून ०४:१७ सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४:४८ वाजता पोहचेल.

प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande