विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शिक्षणाधिकारी व अधिका-यास निलंबित करण्याची मागणी
अहमदनगर, 24 एप्रिल (हिं.स.):- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय
विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले शिक्षणाधिकारी व अधिकार्यास नितंबित करावे


अहमदनगर, 24 एप्रिल (हिं.स.):- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ओबीसी सेल वतीने जिल्हा परिषदे चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्यथा जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ,दानिश शेख,गुलाम शेख,अजय बडदे,रवी कानडे,आदिल शेख,विकास पटेकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहा य्यक कक्ष अधिकारी यांच्यावर १० एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.सदर गुन्हा गंभीर असून,वरील व्यक्तींना निलंबित केले गेले नाही.कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत निलंबन करणे बंधनकारक असते.मात्र या प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.गुन्हा दाखल होऊनही सदरील व्यक्ती कोणाच्या आशिर्वादाने कामावर रुजू झाले? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.या व्यक्तीचे तातडीने निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.अन्यथा जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande