रत्नागिरीत कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर सुरू
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तम व दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत या
रत्नागिरीत कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीचे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर सुरू


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातून उत्तम व दर्जेदार क्रिकेटपटू तयार व्हावेत या उद्देशाने रत्नागिरी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कै. छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमीतर्फे शालेय मुला-मुलींसाठी उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिर सुरू झाले आहे. ते ५ मेपर्यंत चालणार आहे.

प्रशिक्षण शिबिर सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात चालू आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक बावा चव्हाण, हरीश लाडे, राजेंद्र यादव, साईप्रसाद एरम, रत्नागिरीतील नामवंत क्रिकेटपटू राजीव सावंत, अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत मार्गदर्शन करत आहेत.

उत्तम प्रशिक्षक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देत असल्यामुळे या अॅकॅडमीने आजपर्यंत जवळपास १०० हून खेळाडू जिल्ह्यासाठी दिलेले आहेत. त्यातील काही जणांची महाराष्ट्र व गोवा संघाकडून राज्यपातळीवर निवड झाली आहे. शालेय क्रिकेटपटूंसाठी आता आधुनिक पद्धतीच्या अद्ययावत अॅस्ट्रो टर्फ खेळपट्ट्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी मुंबई व पुणे येथील नामवंत प्रशिक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. शिबिरात क्रिकेटचे आधुनिक तंत्र शिकविण्यावर व फिटनेसवर भर दिला जाणार आहे. शिबिरांतर्गत सराव सामने घेण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी अॅकॅडमीचे सचिव व प्रशिक्षक दीपक देसाई (९८९०४५७९७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्रशेठ पाथरे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande