राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन सुवर्णपदकांसह दहा पदके
रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन सुवर्णपदकांसह दहा
राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन सुवर्णपदकांसह दहा पदके


रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन सुवर्णपदकांसह दहा पदके मिळाली.

तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य ओपन क्योरोगी आणि पुमसे तायक्वॉंदो स्पर्धा रत्नागिरी येथे घेण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव व तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई महासचिव मिलिंद पठारे व तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील २३ खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेत क्योरोगी म्हणजे फाइट प्रकारात लांजा तालुक्यातील ऋग्वेद प्रमोद कदम एन- ४२ किलो आतील व तेजस्विनी वीरेंद्र आचरेकर ओ-७३ किलोवरील वजनी गटात सुवर्णपदक पटकवले. श्रावणी संतोष शेरे, परी संजय जड्यार यांनी रौप्य पदक मिळवले.

मायरा कुणाल जगताप, स्वर्णिम श्रेयस शेट्ये, त्रिशा गणेश यादव, तीर्था गणेश यादव, अरिहंत महेश यादव, तेजस्वी दशरथ लाड यांनी कास्य पदके मिळविली.

या सर्व स्पर्धकांना लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, तायक्वॉंदो महिला प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी आचरेकर, शीतल आचरेकर एक्स्ट्रीम तायक्वॉंदो क्लबचे प्रशिक्षक हर्ष जड्यार यांनी मार्गदर्शन केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande