उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग मैदानी खेळासाठी करावा - हरून शेख
अहमदनगर, 26 एप्रिल (हिं.स.):- मुलांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ हे आवश्यक आहे.सध्या उन्हाळ्याच्या सुट
उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग मैदानी खेळासाठी करावा


अहमदनगर, 26 एप्रिल (हिं.स.):- मुलांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ हे आवश्यक आहे.सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया लागल्या असल्याने त्याचा सद्ुपयोग मुला-मुलींना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.कराटे खेळामुळे स्व:संरक्षणाबरोबर आत्मनिर्भर बनण्यासाठी फार उपयोगी आहे.आज विविध बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंनी कठोर मेहनत करुन हे यश संपन्न केले आहे.या खेळाडूं पुढील स्पर्धांसाठी तयार झाले आहेत.पालकांनी आपल्या मुलांच्या सुदृढ भविष्यासाठी,त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीसाठी कराटे खेळास प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन मुख्य प्रशिक्षक हारुण शेख यांनी केले.

वर्ल्ड फुनाकोशि शोतोकान कराटे संस्थेच्यावतीने विविध बेल्ट परिक्षा घेण्यात आल्या.याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक हारुण शेख,प्रशिक्षक रमजान शेख,तन्वीर खान,बिलाल शेख आदिंसह यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.विविध बेल्ट परिक्षेत उत्तीर्ण झालेले पुढीलप्रमाणे : यलो बेल्ट - कैवल्या नरवडे, शिवतेज वाघ, संचित कुलट, सुजित कुलट, राधेय कांकरिया. ऑरेंज बेल्ट - सोहम फिरोदिया, रिया पालिवाल, दिया गुगळे, शौर्या चिंता, स्पर्श कांकरिया, रिद्धी कांकरिया. ग्रीन बेल्ट - विराज मुनोत, स्वरा कराळे, श्रीहरि इवळे, त्रिशा गुगळे, कस्तुरी नरवडे, सिद्धांत राऊत, रजत काबरा, ईशान राऊत, अनुष्का कोहक, त्रिशा गुगळे, संस्कृती राऊत, संस्कृती नलावडे, नैतिक कंठाळी, वंश काळे. ब्ल्यू बेल्ट - आशकन शाह, पर्पल बेल्ट - सत्यम मुसमुडे, शिवम मुसमुडे. ब्रॉऊन बेल्ट - दृष्टी पित्रोडा. गोल्डन ब्राऊन बेल्ट - सिद्धी कोरडे, श्रावणी काकडे, मिहिर जोशी. ब्लॅक बेल्ट - काव्य उदावंत, गणेश भुजबळ. फस्ट डेन - पार्थ चतारे, अहना भंडारी. यावेळी दिपाली भालेराव, सायली सुपेकर, महेक शेख, विधी गुंदेचा, ऋषीकेश ललवाणी, आशिष शिंदे, स्वराज नारायणे, ईशान होशिंग, अदित्य बोरा, पार्श्व भंडारी आदि ब्लॅक बेल्ट उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचारk


 rajesh pande