महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात
नाशिक, २६ एप्रिल, (हिं.स.) - ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्या
महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात


नाशिक, २६ एप्रिल, (हिं.स.) - ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली नाशिकच्या केन्सिगटन स्पोर्ट्स क्लब चानसी, गंगापूर रोड, नाशिक येथे सुहास वैद्य स्मृती चषक ४४ व्या महाराष्ट्र राज्य ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन मित्र विहार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष विनोद कपूर यांच्या हस्ते आणि भारतीय ब्रीज फेडरेशनचे सहसचिव आनंद सामंत,महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष अविनाश देशपांडे, सचिव हेमंत पांडे, नाशिक ब्रीज असोसिएशन चे अध्यक्ष मोहन उकिडवे, सचिव डॉ. अतुल देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून बावीस संघाच्या १२६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला आहे.

या स्पर्धेत टीम ऑफ फोर (सांघिक स्पर्धा) आणि पेअर्स (जोडी) या दोन प्रकारांचा समावेश आहे. आज टीम ऑफ फोर या सांघिक स्पर्धा स्पर्धांना सुरवात झाली.

या स्पर्धेत सात बोर्डचे आठ राऊंड खेळविले जाणार आहेत. या आठ राऊंड नंतर गुणानुक्रमे पाहिले आठ संघ दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत. तर उरलेल्या १४ संघातील खेळाडूंना पेअर (जोडी) या प्रकारात खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या खेळाडू सोबत काही शाळेचे युवा खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामूळे या युवा खेळाडूंचा चांगल्या दर्जेदार खेळाडू सोबत खेळण्याची संधी आणि अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे.

एकूण सात राऊंड पैकी आज खेळविल्या गेलेल्या चार राऊंड नंतरसुधीर चौधरी, रवींद्रन, राहुल शेट्टी, आर. अंबाझहेगन आणि पराग जोशी यांच्या प्रॉमिस या संघाने सर्वात जास्त ६०.९१ गुण मिळवून आघाडी प्रस्थापित केली आहे. तर, तिसऱ्या राऊंडनंतर पाच व्या क्रमांकावर असलेल्या सुनील माचोर, विजय फातरफेकर, मिलिंद आठवले, अरुण बापट, गोपीनाथ मन्ना आणि अनिल पाध्ये या दर्जेदार खेळाडूंचा समावेश असलेल्या सुनील माचोर संघाने चवथ्या राऊडमध्ये सुंदर खेळ करून ५६. ८६ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर रुईया ब्लेझर्स संघाने (५६.. २४) आणि एस, बी. एस. (५४. ९९) या संघानी अनुक्रमे तिसऱ्या आणि चवथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याखालोखाल श्री राधे ,संघ जेरेजा संघ, मयेकर संघ, मयेकर संघ, अम्ब्रोझा, बालक संघ आणि सरप्राईझ संघ यांनीही चांगला खेळ करून पाच ते दहा या क्रमांकावर झेप घेतली आहे. अर्थात आणखी तीन राऊंड बाकी असल्यामुळे यामध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande