भंडारा - अनियंत्रित चारचाकी वाहन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
भंडारा, २७ एप्रिल, (हिं.स) : मित्राचा लग्नसोहळा आटोपून स्वगावी परत येत असतांना भरधाव चारचाकी वाहनाच्
image


image


image


image


image


image


भंडारा, २७ एप्रिल, (हिं.स) : मित्राचा लग्नसोहळा आटोपून स्वगावी परत येत असतांना भरधाव चारचाकी वाहनाच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन महामार्गाच्या दुभाजक व बॅरिकेट्सला आदळल्याची घटना साकोली येथे नटराज बार समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. संदिप कुलसुंगे (वय २५वर्षे, रा.गणेश वार्ड, साकोली) सारंग कद्रेवार(वय २५वर्षे, रा.सेंदुरवाफा) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक विशाल वाघाडे(२५ वर्षे, रा.साकोली), प्रणय बैरागी (२४वर्षे, रा.साकोली) व कुणाल ठाकरे (१९ वर्ष, रा.सेंदुरवाफा) अशी या अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande