भंडारा - पोलीस अधिकाऱ्यांची हातभट्टीवर धाड, साडेचार लाखांचा मुद्देमाल नष्ट
भंडारा, २७ एप्रिल, (हिं.स) - अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या दृष्टिने काही महिन्यांपासून पोलीस विभाग
image


image


image


image


भंडारा, २७ एप्रिल, (हिं.स) - अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या दृष्टिने काही महिन्यांपासून पोलीस विभागाकडून अवैध धंद्यांवर धाडसत्र मोहीम राबविली जात आहे. तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव एन यांनी पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत हातभट्टीवर धाड घालून ४ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande