केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नकुल अग्रवाल कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल
ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (IRS) यांची केंद्रीय निवडणूक
केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नकुल अग्रवाल कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल


ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी नकुल अग्रवाल (IRS) यांची केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. नकुल अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील २०११ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभासंघाकरिता कामकाज सोपविण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ

24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक नकुल अग्रवाल यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, पेंढारकर कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण येथे भेटण्याची वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक 8369751654 असा असून [email protected] हा त्यांचा ई-मेल आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande