नगर - महात्मा फुले कृषी विद्यापीठ मैदानावर वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेला मोठा प्रतिसाद
अहमदनगर, 2 मे, (हिं.स.) - अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वरिष्ठ गट
महात्मा फुले कृषी विद्यापीठ मैदानावर वरिष्ठ गट मैदानी स्पर्धेला मोठा प्रतिसाद


अहमदनगर, 2 मे, (हिं.स.) - अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलांमध्ये निखिल आव्हाड,ज्ञानेश्वर काळे,किशोर मरकड तर मुलींमध्ये उषा गुढीपाटी,ईश्वरी दराडे,विश्वेषा मिस्कीन व कोमल बनकर यांनी विविध गटात विजय मिळवला आहे.या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे सुनील जाधव व राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेसाठी पंच म्हणून रमेश वाघमारे,संदीप घावटे,जगन गवांदे, श्रीरामसेतू आवारी,समीर शेख,अमित चव्हाण,गुलजार शेख,शिल्पा म्हात्रे,राघवेंद्र धनलगडे,सुजित बाबर,जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश भालेराव यांनी काम पाहिले.या स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूं ची नागपूर येथे १ ते ३ जून दरम्यान होणा ऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान व क्रीडा अधिकारी डॉ.विलास आवारी यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande